Dream Temple concept
Vision & Mission
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असतांना आपण बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी अहोरात्र जीवतोड प्रयत्न करत असताना किंबहुना स्वतःला त्यात झोकून आपल्या बघितलेल्या स्वप्नांना साकार करण्याचा प्रयत्न करतात याच तुमच्या स्वप्नांना, तुमच्या प्रयत्नांना आकार देण्याच्या उद्देशाने Dream Temple हा उपक्रम फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच !
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे महाविद्यालयीन शिक्षण घेताना सोबतच स्पर्धापरीक्षेची तयारी सुरु केली इतरांसारखे सारसकट वाचन न करता विषयानुसार नोट्स काढण्यास सुरवात केली त्याच उपयोग मला व माझ्या सोबत असणाऱ्या अनेक मित्र परिवाराला झाला. तेव्हापासून आपल्या या ज्ञानाचा उपयोग इतरांना सुध्दा व्हावा ही मनोमन इच्छा होती. त्याला आज मूर्त रूप येत आहे, ते म्हणजे विद्यार्थीदशेत मी पाहिलेल्या स्वप्नातील एक भाग आहे. ते स्वप्न म्हणजे Dream Temple !
Dream Temple या संकल्पनेचे मी आपल्यासाठी अनेक उपक्रम घेऊन येत आहे, त्यामध्ये सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका, वैयक्तिक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, फिरते वाचनालय, तज्ञांकडून स्पर्धा परीक्षेची तयारी, उत्तम आरोग्य व सकारात्मक जीवनशैली बाबत मार्गदर्शन आणि चालू घडामोडी संदर्भातील पुस्तके!
Dream Temple या संकल्पनेचे ब्रीदवाक्ये आहे ,"स्वप्ने तुमचं ,सहकार्ये आमचं !"(You Dream Our Co-Operation) माझ्यासारखेच तुमचेही स्वप्न आहे ,अधिकारी होण्याचे ,म्हणुन तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांना Dream Temple मधील विविध उपक्रमाद्वारे सहकार्ये करण्याचा प्रयन्त आहे. तुमचे स्वप्नं पूर्ण करण्यात माझा खारीचा वाटा देण्यासाठी पहिले पाउल म्हणजे , KATE'S" समग्र चालू घडामोडी हे पुस्तक !
Dream Temple संकल्पेनेचा मुळ उद्देश हा मन आणि बुद्धीचा सशक्तीकरणासाठी तसेच इच्छा व कल्पना यांच्यातील संघर्षे टाळण्यासाठी केलेला अभिनव प्रयन्त आहे,कारण आपण स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करतांना आपल्याला यश कधी कधी अपयशाचा सामना करावा लागतो,अनेक अडचणी जसे अर्धिक,सामाजिक,वैयक्तिक आपल्या वाट्याला येतात,मग त्यातुन काही दुर्देवी घटना घडतात. मागील वर्षी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या दोन-तीन मित्रांनी टोकाची पावले उचलेली आणि आपला जीवनप्रवास संपवला. हे योग्य नाही सबब परीक्षा अभ्यासाबरोबर मन,बुद्धी ,इच्छा व कल्पना यांचा मेळ घालून आपल्याला यश मिळवावे लागेल आपल्याला सहकार्ये करण्यासाठी हा उपक्रम !
अलीकडे बदलेले स्पर्धा परीक्षेचे स्वरूप आणि स्पर्धा परीक्षेमध्ये येणारे प्रश्न या सर्वांचे विश्लेषण,स्पर्धा परीक्षेचा कल लक्षात घेऊन, तसेच परीक्षार्थी, विद्यार्थी मित्रांसोबत चर्चा करून शृंखलेतील दुसरे पाऊल म्हणजे "Dream Temple अभ्यासिका" आपल्या सेवेत. तसेच Dream Temple शृंखलेतील इतर उपक्रम लवकरच आपल्या सेवेत !
आपल्या सर्वांना स्पर्धा परीक्षेतील वाटचालीस तसेच येणाऱ्या सर्वे परीक्षांसाठी शुभेच्छा !